प्रवाशांचा न्यायह्क्कासाठी एक चळवळ

शब्दांनाही कोडं पडावं अशी काही गोड माणसं असतात;
केवढं आपलं भाग्य असते जेव्हा ती आपली असतात.

 

सोलापुर पुणे प्रवासी संघटना स्थापना १९.०८.२००८ ला करण्यात आली. सोलापुर, पुणे, पंढरपूर,केम,कुर्डुवाडी,माढा ,मोहोळ,पास धारक व प्रवासी यांच्या अडचणी सोडवन्या करीता संघटना स्थापन करण्याचे मुख्य कारण आहे. रेलवे पशासन व प्रवासी याच्यात स्नमय साधणे हे महत्वाचे उद्दीष्ट होते ते आम्ही साध्य केले आहे.व यापुढे प्रवास्याच्या अडचणी सोडवन्याबाबत आम्ही कटीब्द आहोत. आमची संघटना प्रवाश्याची सुरशीतता व सुखाने प्रवास करता यावा याची सूचना देत असते व तसेच सामाजीत उपक्रम ही करत असते.

अध्यक्ष                        :-  संजयदादा टोणपे   
कार्याध्यक्ष                    :-  मुकुंद बोकेफोडे   
सचिव                          : - महावीर शहा
उपाध्यक्ष                      : - श्रीनिवास बागडे, दीपक ढवाणसर ,प्रविन चौरे (माढा)
सहसचिव                      :-  जाफर पठाण
खजीनदार                     :- प्रमोद बळे  
सह खजीनदार                :- विजयकुमार चांदणे
प्रसिध्यी प्रमुख                :-  दर्शन शिरसकर,शफिक शेख  
कायदेशीर सल्लागार        :- अँड सुरेश उमराव बागल (अँडव्होकेट व नोटरी भारत सरकार )
 

 

News

‘सोलापूर-नागपूर’एक्स्प्रेसच्या मुदतवाढीसाठी विभागाचे प्रयत्न

22/06/2015 12:51
सोलापूर - सोलापूर-नागपूर एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याची विनंती करणारा प्रस्ताव सोलापूर रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे पाठवला आहे. तसे झाल्यास ही गाडी नियमित होऊ शकेल. येत्या २४ जूनला या गाडीची शेवटची फेरी होईल. उन्हाळ्याच्या सुटीत ही विशेष गाडी सुरू करण्यात आली होती. गेल्या...

रेल्वेवर दरोड्याचा डाव फसला, ‘आरपीएफ’कडून गोळीबाराच्या फैरी

22/06/2015 12:50
सोलापूर - सिकंदराबादहून-राजकोटलाजाणारी राजकोट एक्स्प्रेस गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास पोफळज रेल्वे स्थानकावर लुटण्याचा प्रयत्न झाला. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी गाडीवर तैनात असलेल्या आरपीएफ जवानांनी राऊंड फायर केल्याने दरोडेखोर पळून गेले. प्रत्युत्तरात दरोडेखोरांनीही मोठ्या प्रमाणावर गाडीवर...

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचा रेल्वेखाली सापडून मृत्यू

22/06/2015 12:48
सोलापूर - ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आनंद सिध्दलिंगप्पा हत्तरके (वय ३२, रा. हत्तूरे वस्ती, मल्लिकार्जुन नगर) यांचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी कुमठे रेल्वे गेटजवळ उघडकीस आली. आनंद हत्तरके यांचा टेम्पोचा व्यवसाय होता. त्यांनी आत्महत्या केली आहे की रेल्वेच्या धडकेने...

मुंबई पाऊस : सोलापूरकडे येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत

22/06/2015 12:46
सोलापूर - रुळावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने गाड्यांना धावण्यास रुळ उपलब्ध नाही. शुक्रवारी इंद्रायणी एक्सप्रेसचे अनेक प्रवासी पुण्याला जाण्यासाठी सोलापूर स्थानकावर दाखल झाले. स्थानकावर पोहचण्यानंतर गाडी रद्द झाल्याचे कळाले. रेल्वे प्रशासनाकडून इंद्रायणीच्या आरक्षित तिकीटधारकांना तिकीटाचे...

एक्स्प्रेस वेवर खंडाळ्याजवळ दरड कोसळली, मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प

22/06/2015 12:44
मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक रखडली आहे. मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे.   खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे, वाहतूक जुन्या मार्गावर वळवण्यात आली आहे. आधीच पावसामुळे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच आज सोमवार...

योग अभ्यासात रमले सोलापूरकर

22/06/2015 12:40
सोलापूर- सूर्य उगवण्यास अजून अवकाश होता. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि तरुणी यांचे जथ्ये खुल्या मैदानांकडे निघाले होते. पांढऱ्या पोशाखातील या मंडळींच्या हातात बेडशीट, सतरंजी, चादरी होत्या. मैदानात एका समान रांगेत आसनस्थ झाले. मुख्य मंचावरून प्रात्यक्षिके सुरू झाली. त्यासरशी साऱ्यांनी...

अर्थसंकल्पासाठी तीन नव्या गाड्या

16/10/2013 16:55
सोलापुर-पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे अर्थसंकल्पासाठी तीन नव्या गाड्या तर वैष्णवीचे दर्शन.. या गाड्यांसाठी जादा कोचेस अन्य रेल्वे गाड्यांचे डबे वाढविण्याचा प्रस्ताव सोलापूर : आगामी रेल्वे अर्थसंकल्पाचा विचार करून मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने तीन नव्या गाड्यांचा प्रस्ताव...

रेल्वे वेळापत्रक बदलण्याची मागणी

23/09/2013 14:06
मिरज-कुडरुवाडी पॅसेंजर गाडी वगळता उर्वरित सर्व रेल्वेगाड्या सांगोलेकरांना सोईच्या नसून त्यांचे वेळापत्रकात सुधारणा करून बदल करावेत, अशी मागणी प्रवाशी संघटनेने केली आहे. मिरज-कुडरूवाडी दरम्यान सध्या मिरज-कुडरूवाडी पॅसेंजर, मिरज-पंढरपूर सुपरफास्ट, मिरज-परळी (पॅसेंजर) व कोल्हापूर-सोलापूर या रेल्वे...

र्जमनीची कंपनी बनवणार वेळापत्रक तीन मिनिटांनी धावणार उपनगरीय लोकल

23/09/2013 13:50
मुंबई  : उपनगरीय लोकल दर तीन मिनिटांनी धावते, असे जरी सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र उपनगरीय लोकल दर तीन मिनिटांनी धावतच नाही. त्यामुळे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसीने) उपनगरीय लोकल मार्गाच्या विकासासाठी हाती घेतलेल्या योजनांमधून दर तीन मिनिटांनी लोकल आणि स्वयंचलित...

प्रवाशांना कधी पावणार?

23/09/2013 13:41
गणपतीवर भक्तांची किती श्रद्धा आहे, याचा प्रत्यय गणेशोत्सवाच्या काळात येतो. आबालवृद्ध, महिला-पुरुष सर्वच जण दहा दिवस गणरायाच्या भक्तीत लीन होऊन जातात. भाविक त्याला वेगवेगळय़ा रूपात पाहतात. कुणाला तो सुखकर्ता वाटतो तर कुणाला दु:खहर्ता. बुद्धिवादी त्याला विद्येचा देवता मानतात, तर कलेचा देवता म्हणून तो...

समस्यांच्या गर्दीतून "जयसिंगपूर एक्‍स्प्रेस' सुसाट!

30/07/2013 15:42
जयसिंगपूर- रेल्वेच्या उत्पन्नाचा आलेख सातत्याने चढता राखणाऱ्या जयसिंगपूर रेल्वे स्थानकातील गैरसोयींकडे प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने समस्यांच्या गर्दीतून सुसाट धावणाऱ्या "जयसिंगपूर एक्‍स्प्रेस'ला आता प्रशासनाने ब्रेक लावावा, अशी मागणी प्रवाशांमधून होऊ...

रेल्वेचे ‘शुगर फ्री’ जेवण..

14/06/2013 14:21
आयआरसीटीसीची योजना : ऑगस्टपासून होणार प्रारंभ मुंबई : लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवास करणार्‍या डायबिटीसपीडित प्रवाशांना आयआरसीटीसीकडून (इंडियन रेल्वे कॅटरिंग टुरिझम कॉर्पोरेशन) एक खूशखबर देण्यात येत आहे. डायबिटीस झालेल्या प्रवाशांची प्रवास करताना गैरसोय होऊ नये म्हणून शुगर फ्री जेवण देण्याचा...

रेल्वेत अतिरेकी हल्ल्याची धमकी?

10/06/2013 14:26
मुंबई : मुंबईतील रेल्वे स्थानके अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असताना आता रेल्वे गाड्यांत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी अतिरेक्यांनी दिल्याची माहिती हाती आली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील नागपूर, पुणे, मुंबईसह प्रमुख रेल्वे स्थानकांसह गर्दीच्या रेल्वे गाड्यांमध्ये बंदोबस्त वाढविण्यात आला आहे....

कोकण रेल्वेच्या आठ गाड्यांची वेळ बदलली

06/06/2013 14:30
मुंबई : पावसाळ्यात कोकण रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि त्याचबरोबर गाड्या वेळेवर धावतील याची काळजी कोकण रेल्वेने घेतली आहे. कोकण रेल्वेने पावसाळी वेळापत्रक जाहीर केले असून, कोकणात धावणार्‍या आठ गाड्यांच्या वेळेत बदल केल्याचे कोकण रेल्वेच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. १0 जून ते ३१...

सोलापूरसाठी "थोडी खुशी बहोत गम'

27/02/2013 11:48
सोलापूर - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने यंदाच्या अर्थसंकल्पातून नव्या सात गाड्यांची अपेक्षा केली होती. तसेच तीन गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ, पाच गाड्यांच्या पल्ल्याचा विस्तार तसेच 13 गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात यावी असा प्रस्तावही रेल्वे मंत्रालयाला पाठविला होता. परंतु सोलापूरहून...

कोणार्क एक्सप्रेसला कुर्डुवाडीत थंबा,सोलापुर पुणे प्रवासी संघटनानेचा पाठपुरावा

12/02/2013 13:07

अलाहबाद दुर्घटनेतील मृतांची संख्या ३६वर

11/02/2013 13:06
अलाहबाद, दि.११ - कुंभमेळ्याहून परतणा-या भाविकांची अलाहबाद स्टेशनवर गर्दी उसळून झालेल्या चेंगराचेंगरीत ठार झालेल्या संख्या ३६ वर पोचल्याचे वृत्त आहे. रविवारी मौनी अमावस्येनिमित्त भाविकांनी गंगास्नान केले. त्यानंतर संध्याकाळी अलाहबाद स्थानकावर आलेल्या भाविकांमुळे पाच व सहा क्रमांकाच्या प्लॅटपॉर्मवर...

अलाहाबाद रेल्वे स्थानकातील दुर्घटना

11/02/2013 12:59
मौनी अमावस्येनिमित्ताने अलाहाबादच्या त्रिवेणी संगमात महास्नान करून परतत असलेल्या भाविकांच्या चेंगराचेंगरीत ३६  जणांचा मृत्यू  झाला  आहे.  अलाहाबाद रेल्वे स्थानकात ही भीषण दुर्घटना घडली. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. तत्पूर्वी कुंभमेळ्यातील सेक्टर १२ मध्ये झालेल्या...

ऐरोली-ठाणे मार्गावर लोकल घसरली

10/02/2013 13:08
मुंबई/ठाणे। दि. ९ (प्रतिनिधी) पनवेल-ठाणे मार्गावर ऐरोली स्थानकादरम्यान आज सायंकाळी ४ वाजता लोकलचे चार डबे घसरून ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. ठाण्याकडे अपच्या दिशेने येणार्‍या या लोकलचे एक सोडून एक असे चार डबे घसरल्याने नेमका हा अपघात का व कसा झाला याबाबत आश्‍चर्य व्यक्त...

मध्य रेल्वेची पाचव्या दिवशीही बोंब!

03/01/2013 14:32
ठाणे। दि. २ (प्रतिनिधी) ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान सुरू असलेले यार्ड रिमॉडेलिंगचे बहुतांशी काम संपुष्टात आले असतानाच बुधवारी स्थानकातील सिग्नल यंत्रणेत अचानक बिघाड झाला. त्यामुळे धिम्या गती मार्गावरील अपच्या लोकल तब्बल सव्वा तासाच्या विलंबाने धावल्या. लाखो चाकरमान्यांना आजही लेट मार्कला सामोरे...

रेल्वे प्रवासासाठी आजपासून ओळखपत्राची सक्ती

01/12/2012 13:14
कोल्हापूर- रेल्वे तिकिटांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या आरक्षित डब्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटासोबत त्यांचे ओळखपत्र बंधनकारक केले आहे. उद्यापासून (शनिवार) हा नियम लागू होत आहे. ओळखपत्र नसल्यास दंडात्मक कारवाई होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. रेल्वेच्या...

कुर्ला रेल्वेच्या नव्या इमारतीचे आज उद्‌घाटन

01/12/2012 13:09
मुंबई- मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसची (कुर्ला) नवीन अत्याधुनिक इमारत प्रवाशांच्या सेवेसाठी उद्या (ता. 1) खुली होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्या सायंकाळी 6 वाजता या इमारतीचे उद्‌घाटन होईल. मध्य रेल्वेने 22 कोटी रुपये खर्च करून कुर्ला टर्मिनसची नवीन इमारत...

नागपूर एक्‍स्प्रेसचा मिरजेत मुक्काम 30 तास

23/11/2012 13:21
मिरज - कोल्हापूर-नागपूर एक्‍स्प्रेसला मिरजेत तब्बल तीस तासांचा मुक्काम देण्यात येत आहे. या कालावधीत ही गाडी कोल्हापूर-पुणे एक्‍स्प्रेस म्हणून सोडावी, अशी मागणी आहे. गाडी आणि कर्मचारी उपलब्ध असतानाही सक्तीचा मुक्काम दिल्याने नुकसान होत आहे. नागपूर-कोल्हापूर एक्‍स्प्रेस परतल्यानंतर गाडी...

पंढरपूर यात्रेसाठी आजपासून जादा गाड्या

21/11/2012 13:22
मिरज - पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेसाठी कोल्हापूर-उस्मानाबाद आणि मिरज-कुर्डुवाडी मार्गावर जादा रेल्वे सोडण्यात येणार आहेत. उद्यापासून (ता. 21) 29 नोव्हेंबरपर्यंत त्या धावतील. रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी आज ही माहिती दिली. गाड्या व त्यांचे...

मध्ये रेल्वेची हेल्पलाईन सुरू

20/11/2012 13:24
मिरज - रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि तक्रारीसाठी मध्य रेल्वेने हेल्पलाईन क्रमांक जाहीर केलेत. रेल्वेत प्रवास करतानाही मोबाईलवरून तक्रार, सूचना करता येईल. 9004414444 आणि 9833331111 हे दोन क्रमांक रेल्वेने सुरू केलेत. पहिला क्रमांक रेल्वे सुरक्षा दल नियंत्रण कक्ष, छत्रपती शिवाजी टर्मिनस...

ऊस आंदोलनामुळे रेल्वे फुल्ल

18/11/2012 13:26
कोल्हापूर - ऊसदर आंदोलनाची धग आजही कायम असल्याने सांगली, मिरज, सोलापूर मार्गावरील बस वाहतूक अद्यापही तुरळक सुरू आहे. परिणामी प्रवाशांना रेल्वेचाच आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे कोल्हापूर-मिरज-सोलापूर मार्गावरील प्रवासासाठी रेल्वेला प्रवाशांची मोठी गर्दी केली. आठ दिवसांपासून ऊसदराबाबत...

सोलापूर विभागातून सात नवीन गाड्यांचा प्रस्ताव

10/11/2012 13:05
सोलापूर - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने नव्याने सात गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला आहे. कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला विविध मार्गांवरून बारा गाड्यांचा प्रस्ताव असल्याची माहिती वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी दिली. आगामी आर्थिक वर्षासाठी सोलापूर ते...

रेल्वे प्रवाशांनाही मनमानीचा फटका

03/11/2012 13:26
सातारा - रिक्षाचालकांच्या मनमानीचा फटका रेल्वे स्थानक तसेच मुख्य बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. त्याचबरोबर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही मनमानी सहन करावी लागत आहे. क्षेत्र माहुली येथील रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना साताऱ्यात आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने...

रेल्वे आणि प्रवाशांची सुरक्षा हेच 'आरपीएफ' चे कर्तव्य

29/10/2012 13:28
सोलापूर - रेल्वेची आणि रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता हेच "आरपीएफ' चे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय रेल्वे सुरक्षा बल संघटनेचे राष्ट्रीय महासचिव यू. एस. झा यांनी केले. अखिल भारतीय रेल्वे सुरक्षा बल संघटनेच्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष...

रेल्वेस्थानकावर विजेचा अपव्यय

26/10/2012 13:31
सोलापूर - राज्यात विजेच्या तुटवड्यामुळे भारनियमनाची परिस्थिती असताना सोलापूर रेल्वेस्थानकावरील अनेक कार्यालयांमध्ये विजेचा अपव्यय मोठ्याप्रमाणात होत असल्याचे चित्र गुरुवारी दिसले. सोलापूरच्या रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिस वायरलेस, सीटीएस कार्यालय, स्टेशन प्रबंधक, उपस्टेशन प्रबंधक, मुख्य...

पुणे-सोलापूर इंटरसिटीवर दरोडा

24/09/2012 10:55
पुणे-सोलापूर इंटरसिटीवर दरोडा टाकणा-या एका चोरट्याला पकडण्यात आलं होतं. मात्र, धक्कादायक बातमी अशी, की या पकडलेल्या दरोडेखोराला पोलिसांनीच सोडून दिल्याचं समोर आलंय. रेल्वे प्रवाशांनीच पोलिसांना या दरोडेखोराकडून पैसे घेताना रंगेहाथ पकडल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त...

इंटरसिटीवर ढवळसजवळ दरोडा ल्ल चार महिला जखमी; नऊ प्रवाशांचे दागिने लुटले !

24/09/2012 10:42
कुडरूवाडी। दि. 23 (वार्ताहर) पुण्याहून सोलापूरकडे निघालेल्या इंटरसिटी हुतात्मा एक्स्प्रेसवर ढवळस (ता. माढा) येथे अज्ञात 10 ते 15 चोरटय़ांनी दोन बोगीवर धारदार शस्त्राने हल्ला करून नऊ प्रवाशांचे दागिने लुटून नेले. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात तीन महिला जखमी झाल्या. ही घटना रात्री 8.35 ते 8.50...

रेल्वे तिकिट आरक्षणही प्रीपेड

30/08/2012 16:45
मुंबई, दि. ३० - रेल्वेचे तिकिट आरक्षित करणे ऑनलाइन व्यवस्थेमुळे आता अगदी सोपे झालेले असतानाच, रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ अर्थात आयआरसीटीसीने आरक्षण यापेक्षाही अधिक सुलभ करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रोलिंग डिपॉझिट स्कीम अर्थात आरडीएस नावाची नवी योजना त्यासाठी राबवण्यात येणार...

रेल्वेवर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

31/07/2012 13:02
पुणे। दि. ३0 (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून रेल्वेवर दरोडा टाकून प्रवाशांना लुटणार्‍या टोळीतील ५ जणांना पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखा व रेल्वे पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. सागर दादा कामठे (वय १९, रा. कुगाव, ता. करमाळा), अतुल शिवाजी निंभोरे (वय २२), कैलास मारूती वगरे (वय २२, रा....

अपघात की घातपात ?

31/07/2012 13:00
  - ‘तामिळनाडू एक्स्प्रेस’ दुर्घटनेची होणार सखोल चौकशी नेल्लोर। दि. ३0 (वृत्तसंस्था) तामिळनाडू एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागण्यापूर्वी त्यात स्फोटासारखा आवाज आल्याचे...

तामिळनाडू एस्क्प्रेसच्या आगीत ३२ ठार

31/07/2012 12:58
  दिल्लीहून चेन्नईकडे जाणार्‍या ‘तामिळनाडू एक्स्प्रेस’च्या एका डब्याला लागलेल्या आगीत सोमवारी पहाटे साखर झोपेत असलेले ३२ प्रवासी जळून खाक झाले. यात २५जण गंभीररीत्या भाजले असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. नेल्लोर स्थानकापासून जेमतेम एक कि.मी. अंतरावर आली असताना...

लोकलवर खूश; स्टेशनवर नाखूश

31/07/2012 12:48
शिवाजीनगर-लोणावळा लोकलच्या प्रयोगावर प्रवासी खूश असले , तरी दुसरीकडे स्टेशनवरील तोकड्या सोयीसुविधांवर मात्र तीव्र नाराज आहेत. पुणे स्टेशनवरील लोकलचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लोणावळ्याकडे जाणार्या दोन लोकलगाड्या शिवाजीनगरवरून सोडण्याचा निर्णय घेतला , त्यानुसार रविवारपासून हा...

नाशिक, औरंगाबाद मार्गावर शीतल बससेवा

31/07/2012 12:47
प्रवास आरामदायी व्हावा , म्हणून एसटीने मुंबई-नाशिक आणि मुंबई-औरंगाबाद या मार्गावर निमआराम वातानुकूलित शीतल बससेवा सुरू करण्याचे निश्चित केले आहे. येत्या एक ऑगस्टपासून या बससेवेला सुरूवात होणार आहे. नाशिकमधून सकाळी पावणेसात वाजता सुटणारी बस अकरा वाजता मुंबईला पोहोचणार आहे. मुंबई...

कुर्डुवाडी पॅसेंजर उद्यापासून

30/07/2012 13:18
मिरज - रेल्वे अंदाजपत्रकात घोषित मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर मंगळवारपासून (ता. 31) नियमित सुरू होत आहे. पहाटे 6.05 वाजता ती मिरजेतून निघेल व कुर्डुवाडीत 10.35 ला पोचेल. तेथून 11.50 ला सुटेल; तर मिरजेत 4.25 ला येईल. मिरज-पंढरपूर मार्गावर नियमित धावणारी ही चौथी गाडी असेल. पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी...

रेल्वे माथाडींचे काम बंद दुसऱ्या दिवशी सुरूच

27/07/2012 13:24
कोल्हापूर - रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेने मूलभूत सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी सुरू केलेले काम बंद आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरू राहिले. खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधून कामगारांनी येथे सोयीसुविधा पुरविण्याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाशी बोलणी करावीत, अशी मागणी...

रेल्वे मालधक्का माथाडींचे काम बंद आंदोलन सुरू

26/07/2012 13:27
कोल्हापूर - रेल्वे गुडस्‌मध्ये सोयी सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी रेल्वे माल धक्का माथाडी कामगार संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले. रेल्वे व्यवस्थापनाशी आज सकारात्मक चर्चा होऊ शकली नाही, त्यामुळे माल चढ-उताराचे काम ठप्प झाले. मागण्या मान्य न झाल्यास पॅसेंजर रेल्वे रोको आंदोलन करण्याचा...

रेल्वे गुडसमधील सुविधांसाठी उद्यापासून माल उचलणे बंद

24/07/2012 13:30
कोल्हापूर - मार्केट यार्ड येथील रेल्वे गुडसमधील सोयीसुविधा तातडीने पुरविल्या नाहीत, तर 25 जुलैपासून माल उचलणे बंद करून रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा आज हमालांच्या संघटनांनी प्रभारी जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांना दिला. त्यामुळे धुळाज यांनी विभागीय रेल्वे अभियंत्यांशी संपर्क साधून...

कोल्हापूर ते हरिद्वार, डेहराडून रेल्वेची मागणी

23/07/2012 13:32
खानापूर - कोल्हापूरच्या महालक्ष्मीहून थेट पवित्र स्थान हरिद्वारहून डेहराडून येथे जाण्यासाठी थेट रेल्वेची मागणी पश्‍चिम महाराष्ट्रातील जवान व गलई बांधवांनी केली आहे. ब्रॉडगेज झालेल्या पंढरपूर मार्गामुळे या मागणीला जोर आला आहे. सांगली जिल्हा गलई व्यवसायासाठी देशात प्रसिद्ध आहे. लष्करात...

मध्य रेल्वे बसवणार 'एलईडी' सिग्नल

23/06/2012 13:12
मुंबई - रेल्वेमार्गालगतच्या सिग्नलच्या खांबाची धडक बसून नाहूर स्थानकाजवळ काही दिवसांपूर्वी तीन प्रवाशांचा बळी गेला होता. या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर मध्य रेल्वेने सिग्नलच्या खांबावरील "प्लॅटफॉर्म' (मचाण) काढून अत्याधुनिक "एलईडी' सिग्नल लावण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेचे...

दुहेरीकरणास हिरवा कंदील ; दौंड ते वाडी दरम्यान विद्युतिकरणही होणार

23/05/2012 10:47
सोलापूर - रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरवात येत्या 15 जूनपासून होणार आहे. 1514 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. दौंड ते वाडी या रेल्वे रुळाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण करण्यात येईल. कर्नाटक, महाराष्ट्र  आणि आंध्रप्रदेश यांच्या मध्यवर्ती...

मालगाडीवर एक्स्प्रेस आदळून २४ ठार, ४० जखमी

23/05/2012 10:17
पी.टी.आय., पेनुकोंडा(आंध्र प्रदेश), बुधवार, २३ मे २०१२ अनंतपूर जिल्ह्य़ातील पेनुकोंडा येथे आज पहाटे बंगलोर येथे जाणाऱ्या ‘हम्पी एक्स्प्रेस’च्या इंजिनाची मालगाडीला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात २४ जण ठार तर अन्य ४० जण जखमी झाले. ‘हम्पी एक्स्प्रेस’च्या चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष करून तशीच गाडी...

सोलापूर 43.2 तापमान पुन्हा वाढले

19/05/2012 10:25
सोलापूर। दि. 19 (प्रतिनिधी) आज (शनिवारी) उन्हाचा पारा 43.2 अंश सेल्सिअसर्पयत पोहोचल्यामुळे दुपारच्या वेळी शहरातील रस्ते निमुनष्य झाले होते. हंगामातील सर्वाधिक तापमानाची आज नोंद झाली. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने अबालवृध्द अस्वस्थ होते. यंदाच्या हंगामात काल शुक्रवार, दि. 18 मे रोजी...

रेल्वे प्रवाशांची झोळी रिकामीच

21/04/2012 12:49
सोलापूर - रेल्वेच्या झोळीत भरभरून दान टाकणा-या सोलापूरकरांना मात्र विविध सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे. गेल्या 20 वर्षांपासून ही परिस्थिती कायम असून, विकासकामे, सुविधा देण्याकडे दुर्लक्ष  करून रेल्वेने शहरवासीयांची क्रूर चेष्टा केली आहे. रेल्वेमार्ग दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या कामांना...

रेल्वे प्रवाशांना ओळखपत्र बंधनकारक

20/03/2012 16:02
नवी दिल्ली, ता. १८ - तिकिटाचा गैरवापर होण्याच्या घटनांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने वातानुकुलित प्रथम श्रेणीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ओळखपत्र बंधनकारक केले आहे. तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच ओळखपत्र बाळगणे बंधनकारक केले आहे. 15 फेब्रुवारीपासून हा निर्णय अमलात...

रेल्वे तिकीट म्हणून "एसएमएस'ही चालेल

20/03/2012 16:00
नवी दिल्ली, ता. 5 - रेल्वे प्रवासासाठी इंटरनेटद्वारे केलेल्या आरक्षणाचा "एसएमएस' इलेक्‍ट्रॉनिक तिकीट (ई-तिकीट) म्हणून ग्राह्य धरण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. आरक्षणानंतर "प्रिंटआउट' बाळगण्याच्या कटकटीपासून प्रवाशांची मुक्तता...
1 | 2 | 3 | 4 | 5 >>

solapur pune pravasi sangatana