नागझिरा अभयारण्य

 संस्कृत भाषेत नाग या शब्दाचा अर्थ हत्ती असाही आहे. फार पूर्वी या जंगलात हत्तींचे वास्तव्य जास्त असावे व त्यावरूनच 'नागझिरा' असे नाव या अभयारण्यास पडले असावे. तलावांचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा यांच्या मधोमध असलेले नागझिरा अभयारण्य १५२.८१ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरलेले आहे. या अभयारण्याची विशेषता म्हणजे यात विद्युत पुरवठा अजिबात नाही, हे जंगल नैसर्गिकच राखले गेलेले आहे.

यात सुमारे २०० च्या जवळपास पक्षांची नोंद करण्यात आली आहे. या तश्या छोट्या अश्या अभयारण्यात वाघासमवेतच बिबळा, रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, चौशिंगा, नीलगाय, चितळ, सांबर, काकर, रानमांजर, उदमांजर, ताडमांजर, उडणखार, सर्प गरुड, मत्स्य गरुड, टकाचोर, खाटीक, राखी धनेश, नवरंग, कोतवाल इत्यादी अनेक प्राणी व पक्षांची नोंद निसर्गप्रेमींनी घेतली आहे.

या सोबतच नजीक असलेली स्थळे कोसमतोंडी,चोरखमारा,अंधारबन,नागदेव पहाडी इत्यादी प्रेक्षणीय आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असलेल्या भंडारा शहरापासून सुमारे ४० कि. मी. अंतारावरील साकोली गावापासून अंदाजे २२ कि. मी. अंतरावर एकीकडे नागझिरा अभयारण्य असून दुसरीकडे सुमारे ३० कि. मी. अंतरावर नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे.

solapur pune pravasi sangatana