महाराष्ट्र पर्यटन

महाराष्ट्र राज्यात दरवर्षी देशाच्या विविध प्रांतांतून चार कोटी आणि परदेशांतून सुमारे २० लाख पर्यटक येतात. त्यापैकी दीड कोटी पर्यटक हे शिर्डीला भेट देतात. परदेशी पर्यटकांपैकी तीन ते साडेतीन लाख पर्यटक राज्याच्या इतर भागांना भेटी देतात.[१] हे पर्यटक मुख्यत्वे ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी आणि व्यावसायिक कारणाने महाराष्ट्रातील शहरांना भेटी देतात. परदेशी पर्यटकांत १९९०पासून शैक्षणिक कारणासाठी आणि २००० पासून वैद्यकीय उपचारांसाठी येणारांचे प्रमाण वाढीस लागले.

देशांतर्गत आणि राज्यांतर्गत पर्यटनामध्ये धार्मिक कारणाने होणाऱ्या पर्यटनाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

 


solapur pune pravasi sangatana