सोलापूर - नान्नज (ता. उत्तर सोलापूर)

 

                     
नान्नज अभयारण्य याला माळढोक अभयारण्य असेही म्हणतात.हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे अभयारण्य आहे व याचे क्षेत्रफळ ८४९६ चौ.कि.मी इतके आहे.यात सोलापूर व नगर जिल्ह्यातील मोठ्या भूभागाचा समावेश होतो. हे अभयारण्य मुख्यत्वे माळढोक या पक्ष्याच्या संरक्षणासाठी तयार केले आहे.[१] कुठल्याही एका पक्ष्यासाठी एवढा मोठा भूभाग संरक्षित करण्याची दुर्मिळ घटना आहे.
 

जंगलाचा प्रकार

महाराष्ट्रातील या अभयारण्याचा भाग हा पुर्णतः पर्जन्यछायेत येतो व महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा भागांमध्ये गणला जातो. त्यामुळे येथे झाडांनी व्यापलेला प्रदेश अतिशय नगण्य आहे. येथील जंगल हे मुख्यत्वे गवताळ आहे व काटेरी वनस्पतींनी व्यापलेला आहे. या मुख्यत्वे बाभूळ, घायपात, आपटा, नीम,शीसव, मापटी, तारवाड, अमोणी, कांचारी यासारख्या वनस्पतींचा समावेश होतो. मराठी साहित्यात या जंगलाचा गवताळ वाखर असा उल्लेख केला आहे.

प्राणिजीवन

वर नमूद केल्याप्रमाणे माळढोक येथील मुख्य वन्यजीव आहे. अत्यंत चिंताजनक प्रजातीतील माळढोकाची संख्या एवढा मोठा भूभाग संरक्षित करुनही अजूनही चिंताजनकच आहे. येथे काळवीट मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. तसेच भारतीय लांडगा येथे आढळून येतो. भारतीय लांडग्याचे वरील नमूद केलेला जंगलप्रकार मुख्य वसतीस्थान आहे. इतर प्रमुख प्राण्यांमध्ये खोकड,मूंगूस व तरस येथे आढळून येतात.

 

 

 


solapur pune pravasi sangatana