बेलापूर किल्ला

एकविसाव्या शतकातील शहर म्हणून नावलौकिक असलेल्या नवी मुंबई शहराला पेशवाईत विशेष मान होता. पेशवाईतील मोठे केंद म्हणून प्रसिद्धी पावलेल्या या शहरात आता इतिहासाच्या खाणाखुणा अगदी दुमिर्ळ झाल्या आहेत. त्याचेच प्रतीक आहे बेलापूरचा किल्ला. पोर्तुगीजांनी आरमाराचं महत्त्व ओळखून पूवीर्च्या साष्टी प्रांताभोवती (आताचे ठाणे) खाडीकिनाऱ्यावर किल्ले बांधले. त्यापैकी एक बेलापूर किल्ला होय. पारतंत्र्याला कंटाळलेली जनता स्वातंत्र्यासाठी धडपडत होती. या असंतोषाचंंं नेतृत्त्व बेलापूर गावाताील गंगाजी नाईक हा पराक्रमी पुरुष करीत होता. पेशव्यांनी वसईचा संघर्ष पुकारला तत्पुवीर् बेलापूर किल्ल्यावरचा लढा, ऐतिहासिक ठरला. दुदेर्वाने या लढ्याचे स्मरण स्थानिकांना राहिलेले नाही.
नवी  मुंबई शहराचा मरीन ड्राइव्ह म्हणून ओळखला जाणारा पामबीच मार्ग बेलापूरला ज्या ठिकाणी सुरु होतो. त्याच ठिकाणी उरणकडे जात असलेल्या रस्त्यावर एक मनोरा लक्ष वेधून घेतो. हा मनोरा ऐतिहासिक असेल याची सुतराम कल्पना वेगाने वाहने हाकणाऱ्या वाहनधारकांना नसेल. पण, हा दगडी मनोरा नसून पेशवे व इंग्रजांच्या काळचा टेहळणी बुरूज आहे. या बुरूजावरून शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवले जायचे. आता हा बुरूज कसाबसा अस्तित्त्व टिकवून आहे. बेलापूर किल्ल्याची शान असलेला पूवेर्कडचा अवघा एक बुरूज आज पडीक अवस्थेत आहे. आज या ऐतिहासिक वास्तूला आधुनिक वास्तूंनी वेढले आहे. शेजारीच सिडकोने पंचवीस वर्षापूवीर् अधिकाऱ्यांसाठी गेस्ट हाऊस बांधले पण किल्ल्याची डागडुजी करण्याचे मात्र टाळले. या किल्ल्याच्या बाजूला सनदी अधिकाऱ्यांच्या आलिशान वास्तू उभ्या राहिल्याने या किल्ल्याचे अस्तित्वच संकटात आले आहे.
बेलापूर किल्ल्यावर ११ आणि तटबंदीवर ६ अशा एकूण २० तोफा होत्या. मुंबई बेट, साष्टी, पनवेल या जलमार्गाबरोबर प्रबळगड, मलंगगड, कर्नाळा या किल्लावर नजर रोखण्याची जबाबदारी बेलापूर किल्ला पार पाडायचा. नारायण जोशी या पेशव्यांच्या पराक्रमी सेनापतीने बेलापूर किल्ल्यावर साहसी चढाई केली तेव्हा घनघोर लढाई झाली. ३१ मार्च १७३१ साली झालेल्या या लढाईत पेशव्यांनी चिवट पोर्तुगीजांना होणारा पाणीपुरवठा आणि रसद पुरवठा बंद केल्यामुळे मराठ्यांपुढे हतबल झालेला पोर्तुगीज किल्लेदार २८ एप्रिल १७३१ साली कुटुंबासह गलबतात बसून निघून गेला आणि पेशव्यांनी या किल्ल्यावर जरीपटक्याचे निशाण फडकवले. पेशव्यांच्या बेफिकिरीमुळे नंतरच्या काळात बिटिशांचा अंमल या किल्ल्यावर कॅप्टन चार्ल्स याच्या अधिपत्याखाली पुन्हा सुरु झाला. सवाई माधवरावांच्या कारकिदीर्त तोतया सुखनिधन नामक कनोजी ब्राह्माणाचे प्रकरण गाजले. पेशव्यांचं किल्लेदार मानेजी आंग्रे या किल्लेदारांनी भामट्याची वरात काढून त्याची रवानगी पुण्याकडे केली. मात्र सदाशिवभाऊंनी इंग्रजांबरोबर हातमिळवणी केल्याने २३ जून १८१७ साली हा किल्ला पेशव्यांच्या हातून गेला.

या किल्ल्याच्या पायथ्याशी आजही किल्ल्याशी संबंधितांचे वंशज वास्तव्यास आहेत. आजही ऐतिहासिक पाण्याची विहीर १७३२ साली बांधल्याची नोंद असलेली आहे. साधारणत: याच काळातले गायधनी आणि आताचे गोवर्धनी माता मंदिर आहे. आता या प्राचीन मंदिराचा विश्वस्त असलेल्या विधान परिषद सदस्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मंदिराचा जीणोर्द्धार हाती घेतला आहे. आज या किल्लाचा एकच बुरुज शाबूत आहे. मात्र काही वर्षांपूवीर् संपूर्ण किल्ला होता. पुकार या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी किल्ल्याचा काही भाग कोसळला. सिडकोच्या बेफीकिरीने मंदिराजवळील मोठा बुरुजही कोसळला. गेस्ट हाऊसचे बांधकाम करताना एक बुरुज पडला. दरसाली अश्विन महिन्यात या किल्ल्याच्या पायथ्याशी जत्रा भरते. आज दुरवस्थेतील हा किल्ला नवी मुंबईची शान आहे याचेच भान संबंधितांना राहिलेले नाही. किल्ल्याच्या आवारात झालेले बांधकाम याचा धडधडीत पुरावा आहे.

निष्क्रीय राजकारणी व सिडकोच्या बेफिकीरीचा उत्कृष्ट नमुना हा बेलापूर किल्ला आहे. आजही अनेकांना झाडाझुडपामध्ये किल्ला आहे याची जाणच नाही. कारण या किल्ल्याला पाहिजे तशी प्रसिद्धीच मिळालेली नाही. पूवीर् गोवर्धनी माता मंदिराच्या पायऱ्या चढून किल्ल्याची वाट चढता यायची. आता तीदेखिल सुविधा नाही. याठिकाणी कुंपण घालून किल्ल्यावर जाणारी वाटच बंद करण्यात आली आहे. दाट वनराईंमध्ये किल्ला शोधल्याशिवाय सापडत नाही. एकदा वाट सापडल्यावर पुन्हा वाट चुकण्याचा संभव अधिक आहे. शिवाय निर्मनुष्य भाग असल्याने व दाट झाडीमुळे सर्पांचा, विषारी प्राण्यांचा धोका असल्याने या तेजपुंज इतिहासाचा दौरा करताना जरा जपलेले बरे असते. सह्यादीच्या कड्याकपाऱ्यातून मावळयांच्या वाशीच्या पट्टयात लढाई केल्याची नोंद ऐतिहासिक बखरीमध्ये आहे. तसेच बृहस्पती स्वामींनी पेशव्यांना बेलापूर किल्ल्यासंबंधी लिहिलेल्या दस्ताऐवज बखरींचा रुपात वाचायला मिळतो. इंग्रजांनी बेलापूर किल्ल्यावर दप्तरखाना चालू करुन महसूल प्राप्तीचा दर्जा नंतर या भागाला दिला. याठिकाणी नंतर दप्तरखाना होता. या ठिकाणची संबंधित कागदपत्रे गहाळ झाल्याचा संशय व्यक्त केला जातो.

उरण परिसरातील खांदेरी उंदेरी सारखे किल्ले टिकवले जात असताना बेलापूर किल्ल्याचे अस्तित्व टिकण्याची आता शाश्वती राहिलेली नाही. महिनाभर झुंज देवून पेशव्यांनी स्वराज्यात दाखल करुन घेतलेला हा किल्ला आता आपल्याच राज्यात अखेरच्या घटका मोजत आहे. याकडे शिवरायांचे नाव घेवून राज्य करणाऱ्या राजकारण्यांचे दुर्लक्ष होत आहे.

आता पुरातत्व खात्याकडे हा किल्ला संरक्षित करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र लालफितीच्या कारभारामुळे यात अनंत अडचणी येत आहेत. आहेत. यासंदर्भात नुकतीच सरकारच्या अंदाज कमिटीने बेलापूर किल्ल्याची पाहणी केली. यावेळेस सिडकोमार्फत बेलापूर किल्ला संरक्षण व संरक्षित करण्याबाबत प्रेझेंन्टेशन करण्यात आले होते. भावीपिढीच्या माहितीसाठी या किल्ल्याचे अस्तित्व राखण्याची अत्यंत गरज असल्यानेच या कमिटीने बेलापूर किल्ल्याच्या संरक्षणासाठी तातडीने कार्यवाही करण्यास संबंधितांना सूचना केली आहे.

solapur pune pravasi sangatana