बेडसे लेणी

 

 


बेडसे येथील लेण्या महाराष्ट्रातील अतिप्राचीन लेण्यांपैकी एक आहेत.

पुणे-मुंबई रस्त्यावरील कामशेतपासून आठ-नऊ कि.मी अंतरावर बेडसे नावाचे गाव आहे. या गावाजवळ भातराशी नावाच्या दुर्गम पहाडात ही बौद्ध लेणी आहेत. हीनयान पंथाची ही लेणी आहेत. पूर्वाभिमुख आहेत. गावापासून साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर ही लेणी आहेत. चैत्यभूमी, प्रार्थना हॉल, भव्य स्तूप ही येथील वैशिष्ठ्ये आहेत.

वर चढताना पायर्‍यांच्या बाजूने विश्रांतीचे ओटे असल्यामुळे हा प्रवास जाणवत नाही. लेण्यांजवळ थंडगार पाणी असल्याने बरे वाटते.

वर चढून गेल्यावर समोरच व्हरांडा असलेले भले मोठे चैत्यगृह दृष्टीस पडते. हा व्हरांडा चार अष्टकोनी स्तंभावर उभारलेला आहे. हे २५ फूट उंचीचे स्तंभ स्थापत्यशास्त्राचा एक नमुना आहे.

लेण्यांमध्ये हत्ती, घोडे, बैल इत्यादी प्राण्यांबरोबरच निरनिराळे अलंकार घातलेल्या स्त्री-पुरुषांच्या मुर्ती विलोभनीय आहेत.

चैत्यगृहातील स्तंभावर काही बौद्ध प्रतिकंही कोरलेली आढळून येतात. शांतीचा संदेश जगभर पोचविणारा बुद्ध. या प्रतिमोच जणू हा संदेश देत आहेत. येथील बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी गुंफाही पहाण्यासारख्या आहेत. एका गुंफेत साधारण एकच भिक्षू राहू शकेल आशी रचना दिसते.


ब्राह्मी लिपीतील शिलालेख पहावयास मिळतो. काही लेण्यांचे काम अर्धवट राहिलेल्या अशा गुंफा व स्तुपही आहेत.

येथील विलोभनीय कोरीव काम पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.

 


solapur pune pravasi sangatana