प्रवाशांचा न्यायह्क्कासाठी एक चळवळ

शब्दांनाही कोडं पडावं अशी काही गोड माणसं असतात;
केवढं आपलं भाग्य असते जेव्हा ती आपली असतात.

 

सोलापुर पुणे प्रवासी संघटना स्थापना १९.०८.२००८ ला करण्यात आली. सोलापुर, पुणे, पंढरपूर,केम,कुर्डुवाडी,माढा ,मोहोळ,पास धारक व प्रवासी यांच्या अडचणी सोडवन्या करीता संघटना स्थापन करण्याचे मुख्य कारण आहे. रेलवे पशासन व प्रवासी याच्यात स्नमय साधणे हे महत्वाचे उद्दीष्ट होते ते आम्ही साध्य केले आहे.व यापुढे प्रवास्याच्या अडचणी सोडवन्याबाबत आम्ही कटीब्द आहोत. आमची संघटना प्रवाश्याची सुरशीतता व सुखाने प्रवास करता यावा याची सूचना देत असते व तसेच सामाजीत उपक्रम ही करत असते.

अध्यक्ष                        :-  संजयदादा टोणपे   
कार्याध्यक्ष                    :-  मुकुंद बोकेफोडे   
सचिव                          : - महावीर शहा
उपाध्यक्ष                      : - श्रीनिवास बागडे, दीपक ढवाणसर ,प्रविन चौरे (माढा)
सहसचिव                      :-  जाफर पठाण
खजीनदार                     :- प्रमोद बळे  
सह खजीनदार                :- विजयकुमार चांदणे
प्रसिध्यी प्रमुख                :-  दर्शन शिरसकर,शफिक शेख  
कायदेशीर सल्लागार        :- अँड सुरेश उमराव बागल (अँडव्होकेट व नोटरी भारत सरकार )
 

 

News

सोलापूर हायवेचे रुंदीकरण रखडले

08/11/2011 17:53
मृत्यूचा सापळा अशी ओळख असणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गावर दररोज होणाऱ्या अपघाताची संख्या तीन ते चारच्या आसपास आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे अपघातात भर पडत असल्याचे चित्र असताना दुसरीकडे मात्र, सरकारी यंत्रणा या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहात नसल्याचे समोर आले आहे. गेल्या...

नागरकोईल एक्सप्रेसवर सशस्त्र दरोडा, सोलापूर स्थानकात प्रवाशांनाच पोलिसांचा प्रसाद

08/11/2011 17:52
सोलापूर - नागरकोईल एक्सप्रेस गाडीवर कुर्डूवाडीजवळ सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. नागरकोईल एक्सप्रेस  सोलापूर स्थानकात आल्यानंतर संपप्त प्रवाशांनी रेलरोको केला. दिड तास नागरकोईल एक्सप्रेस सोलापूर स्थानकात रोखून धरण्यात आली. यावेळी पोलिसांनी...

सीएसटीत रेल्वेची हेरिटेज गॅलरी

05/11/2011 10:46
ठाणे। दि. ३ (प्रतिनिधी) जगात हेरिटेज दर्जा प्राप्त झालेल्या सीएसटी रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेच्याच दुर्मीळ वस्तूंचा संग्रह करण्यात आला असून त्या सर्व वस्तू ग्रॅण्ड स्टेअरकेसच्या परिसरात आकर्षक पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. अभ्यासकांसह पर्यटकांना, प्रवाशांना या...

रेल मेल लटकलेलेच

05/11/2011 10:44
मुंबई। दि. ४ (प्रतिनिधी) टपाल खात्याच्या रेल मेल सेवेतील कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाकडून सकारात्मक चर्चा होत नसल्याने कर्मचार्‍यांनी आजही आपले काम बंद आंदोलन सुरू ठेवले. टपाल खात्यातील पत्रे रेल्वेतून पुणे, नागपूर, कोल्हापूर व अन्य भागांत पोहोचविण्यासाठी जादा डबा जोडून हा पत्रव्यवहार...

कार्तिकीसाठी 1800 बस सोलापूर विभागामार्फत 150 गाडय़ांची सोय

05/11/2011 10:41
दि. 4 (पंढरपूर) कार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 1800 बसगाडय़ा राज्यभर धावणार असून, पुणे-सातारा रस्त्यावर चंद्रभागा बसस्थानक उभारण्यात आले आहे. यात 18 पत्राशेड उभारले आहेत. सोलापूर विभागामार्फत 150 गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापूर 18, बार्शी 30, करमाळा 15,...

पंढरीत तीन लाख भाविक दाखल कार्तिकीनिमित्त प्रशासकीय, पोलीस यंत्रणा सज्ज; भाविकांचा मुखदर्शनावरच अधिक भर

05/11/2011 10:40
पंढरपूर। दि. 4 (प्रतिनिधी) कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी शुक्रवारी तीन लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याने 'चंद्रभागेकाठी भाविकांची दाटी़़़' असे चित्र सध्या दिसून येत आहे. 6 नोव्हेंबर रोजी होणा:या कार्तिकी...

ज्येष्ठांच्या शिष्टाईने संजय शिंदेंची सरशी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील बदलत्या राजकारणाचे फलित

05/11/2011 10:38
सोलापूर। दि. 4 (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी संजय शिंदे गेल्या वर्षीही इच्छुक होते. ज्येष्ठ संचालकांनी त्यांच्यासाठी शिष्टाई केली होती. पण ऐनवेळी मोहिते-पाटील यांनी दिलीप सोपलांचा पत्ता टाकल्यामुळे शिष्टाई अपयशी ठरली. आता अध्यक्षपदासाठी शिंदे यांच्याबरोबर राजन पाटील यांचे नाव चर्चेत...

नागरकोईल एक्स्प्रेसवर दरोडा कुडरूवाडी-मोहोळदरम्यान दोन डब्यातील प्रवाशांवर हल्ला

05/11/2011 10:37
सोलापूर। दि. 4 (प्रतिनिधी) मुंबई-नागरकोईल एक्स्प्रेस मलिकपेठ व वाकाव (मोहोळ) दरम्यान क्रॉसिंगसाठी थांबल्यानंतर दरोडेखोरांनी चार डब्यांमध्ये घुसून महिलांच्या गळ्यातील दागिने लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री 7.30 वाजता घडली. या गाडीमध्ये पोलीस बंदोबस्त नसल्याने प्रवासी संतप्त झाले. तब्बल सात वेळा...

नागरसोईल एक्स्प्रेसवर दरोडा

05/11/2011 10:35
सोलापूर। दि. ४ (प्रतिनिधी) मुंबई-नागरसोईल एक्स्प्रेस मलिकपेठ व वाकाव (मोहोळ) दरम्यान क्रॉसिंगसाठी थांबल्यानंतर दरोडेखोरांनी चार डब्यांमध्ये घुसून महिलांच्या गळ्यातील दागिने लुटल्याची घटना घडली. पोलीस बंदोबस्त नसल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी सोलापूर रेल्वेस्थानकावर उशीरापर्यंत रेल्वे रोखून...

कोल्हापूर-कुर्डूवाडी एक्‍स्प्रेस रेल्वे सुरू

04/11/2011 14:51
कोल्हापूर - पंढरपूर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीची ठरणाऱ्या कोल्हापूर-कुर्डूवाडी एक्‍स्प्रेस रेल्वेला आजपासून सुरवात झाली. अनेक वर्षांपासून रेल्वे पॅसेंजर असोसिएशनतर्फे ही रेल्वे सुरू करण्याची मागणी होती, ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे प्रवासीवर्गाची सोय झाली असून आज पहिल्या दिवशी...

हैदराबाद-कोल्हापूर दरम्यान हिवाळ्यात 40 स्पेशल ट्रेन

04/11/2011 14:49
कोल्हापूर - हिवाळी सुटीत प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी जाण्यासाठी गर्दी होते. प्रवाशांची गैरसोय विचारात घेऊन मध्य रेल्वेने काही खास गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेबर ते 4 डिसेंबर दरम्यान हैदराबाद ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर); तर 3 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान...

मिरज-पंढरपूर आता अवघ्या दीड तासांत !

04/11/2011 14:43
मिरज-पंढरपूर रेल्वेची गती शंभर किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. सध्या या मार्गावर गाड्या साठच्या गतीने धावतात. वाढीव गतीसाठी गेल्या दोन दिवसांत केलेल्या चाचण्या यशस्वी झाल्या असून रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवण्याची प्रतीक्षा आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रवासी...

पीटलाइनसह प्लॅटफॉर्म एकचे विस्तारीकरण रखडले...

16/09/2011 15:08
सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानकातील अनेक विकासकामे मंजूर असली तरी केवळ निधीअभावी फाईलीत बंद आहेत. सोलापूरहून सुटणाऱ्या गाड्या 24 डब्यांच्या असाव्यात यासाठी किमान 24 डब्यांची मेंटेनन्स लाइन (पिट लाइन) उभी करावी लागते. सध्या सोलापुरात जुनी 18 डब्यांची पिट लाइन आहे. नवी पिटलाइन निधीअभावी अर्धवट...

रेल्वे ई-तिकीट; प्रवाशांची लूट

16/09/2011 15:01
सोलापूर - खासगी केंद्रातून रेल्वेचे ई-तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची केंद्रचालकांकडून दिवसाढवळ्या लूट होत असून, प्रत्येक तिकिटामागे नियमापेक्षा 30 ते 40 रुपयांची जादा आकारणी केली जात आहे. केंद्रचालकांच्या मनमानी कारभारामुळे रेल्वे प्रवासी त्रस्त झाले असले तरी रेल्वेच्या आयआरसीटीसी प्रशासनाचे...

"सिद्धेश्‍वर'च्या वातानुकूलित डब्यांचा अडसर

16/09/2011 14:58
सोलापूर -  मध्य रेल्वे विभागाच्या सोलापूर-मुंबई सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यांचा पूर्वनियोजित क्रम अचानक बदलण्यात आल्याने द्वितीय श्रेणी प्रवासी संभ्रमात पडले आहेत. याबाबतचे निवेदन सोलापुर पुणे प्रवासी संघटनाचे सचिव महावीर शहा यांनी दिले आहे. पूर्वी सिद्धेश्‍वर...

अंधेरीच्या दोघांचा एक्स्प्रेस वेवर मृत्यू

02/09/2011 17:13
पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे वर सोमाटणेजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाच कुटुंबातील दोन जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. मुंबईहून पुण्याला येणाऱ्या मार्गावर बुधवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान हा अपघात झाला. डॉ. सरोज विनोद भट (वय ६०) आणि आरोही आशिष भट (वय ३ वर्षे) अशी अपघातात मरण पावलेल्यांची...

कोकण रेल्वे पुन्हा ठप्प

02/09/2011 17:06
शुक्रवारी सकाळी पोमेंडीजवळ रुळावर माती आणि चिखलाचे ढिगारे पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली. यामुळे अनेक रेल्वेगाड्या ठिकठिकाणी थांबवाव्या लागल्या असून मुंबईतून कोकणात जाणा-या प्रवाशांना पुन्हा अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोकणात पडणा-या संततधार पावसामुळे रेल्वे...

लोकपाल मंजूर होईपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा अण्णांचा निर्धार

27/08/2011 12:04
नवी दिल्ली- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा रक्तदाब कमी झाल्याने एकीकडे डॉक्टर काळजीत असताना खुद्द अण्णांनी मात्र अजून 4-5 दिवस उपोषण सहजपणे करू शकू असा विश्वास व्यक्त केला. भ्रष्टाचार मुळापासून संपवण्यासाठी सशक्त लोकपाल विधेयकाची गरज असून ते मंजूर होईपर्यंत माझे उपोषण सुरुच राहील असे...

शहरात रिमङिाम पाऊस

27/08/2011 12:00
सोलापूर । दि. 26 (प्रतिनिधी) गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने कमी-अधिक प्रमाणात संततधार कायम ठेवली होती. पावसामुळे शहरातील रस्ते जलमय होऊन वाहत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. मघा नक्षत्राच्या शेवटच्या आठवडय़ात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरणात रिमङिाम पावसाला...

बार्शी बसस्थानकावरून दोन लाखांचे दागिने पळविले

13/08/2011 12:02
बार्शी दि. 12 (प्रतिनिधी) राखी पौर्णिमेसाठी माहेरी निघालेल्या मंजुषा शंकर करळे (रा. कपूरना प्लॉट, बार्शी) यांच्या पर्समधून साडेसात तोळे दागिने चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी 4.30 वाजता घडला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंजुषा करळे शुक्रवारी दुपारी शेटफळ...

राखीच्या बंधनाने अपंग जवानांच्या इच्छाशक्तीला मिळाले नवे बळ!

13/08/2011 11:44
पुणे, १२ ऑगस्ट / प्रतिनिधी देशासाठी सीमेवर लढताना कायमचे अपंगत्व आलेल्या जवानांच्या पोलादी हातात राखीचा नाजूक धागा बांधला गेला अन् पाय निकामी झाले असले, तरी या जवानांमध्ये असलेल्या उत्तुंग इच्छाशक्तीला आज पुन्हा नवे बळ मिळाले. खडकी येथील अपंग जवान पुनर्वसन केंद्रात विविध संस्था व शाळांच्या वतीने...

रावेरजवळ पूल खचल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत

09/08/2011 16:17
अकोला, बडनेरा, नागपूर, इटारसी मार्गाने वाहतूक वळवली भुसावळ, २९ जुलै भुसावळ-दिल्ली लोहमार्गावरील रावेर ते वाघोडा रेल्वे स्थानकादरम्यान खचलेल्या रेल्वे पुलाच्या दुरूस्तीचे कार्य प्रशासनाने युद्धपातळीवर सुरू केले आहे. यामुळे उत्तर भारताशी जोडणाऱ्या सर्व रेल्वेगाडय़ा अकोला, बडनेरा, नागपूर व ...

पुलाच्या दुरुस्तीमुळे मध्य रेल्वे पूर्वपदावर

09/08/2011 16:15
भुसावळ, ३० जुलै भुसावळ-दिल्ली लोहमार्गावरील रावेर ते वाघोड रेल्वे स्थानकादरम्यान खचलेल्या पुलाची दुरूस्ती करून या मार्गावरील एकेरी वाहतूक सुरू करण्यात रेल्वे प्रशासनास यश आले आहे. यामुळे मध्यरेल्वेची उत्तरेकडील वाहतूक पूर्वपदावर आली आहे. शुक्रवारी सायंकाळी प्रथम डाऊन मार्ग (दिल्लीकडे जाणारा) आणि...

गुवाहाटी एक्स्प्रेसमध्ये लॅपटॉपची चोरी, संशयितास चोप

09/08/2011 16:12
मनमाड, २ ऑगस्ट गुवाहाटी-मुंबई एक्स्प्रेस गाडीच्या वातानुकुलीत बोगीतून प्रवास करणाऱ्या बिहारमधील एका प्रवाशाचा लॅपटॉप चोरी प्रकरणात संशयितास धावत्या रेल्वेत प्रवाशांनी चोप देऊन मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. पण, तत्पुर्वी त्याचा दुसरा साथीदार हा बऱ्हाणपूर रेल्वे स्थानकात उतरून लॅपटॉप...

कोकण रेल्वेच्या रुळांवर कर्मचारी जखमी

09/08/2011 16:06
संगमेश्वर, ६ ऑगस्ट कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वेस्थानक ते करबुडेदरम्यान येणाऱ्या वांद्री उक्षी येथील बोगद्यात पहाटेच्या वेळी ट्रॅकवर गस्त घालणारा कर्मचारी पॅसेंजर रेल्वेखाली सापडून गंभीर जखमी होण्याची घटना  घडली. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दयानंद...

शाळा बंद करण्याचा निर्णय रेल्वेकडून रद्द

09/08/2011 16:04
मनमाड, ७ ऑगस्ट येथील मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय अखेर रेल्वे प्रशासनाने मागे घेतला आहे. रेल्वेने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने काही दिवसांपासून येथे साखळी उपोषण सुरू केले होते. रेल्वे विभाग पंचवटी कॉलनीत ही शाळा आहे. रेल्वे प्रशासनाने...

पावसामुळे कोकण रेल्वे वाहतूक मिरजमार्गे

22/07/2011 16:01
मिरज - पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली आहे. या मार्गावरील काही गाड्या मिरजमार्गे सोडण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने राजधानी एक्‍स्प्रेस, मंगला एक्‍स्प्रेस, मत्स्यगंधा एक्‍स्प्रेस यांचा समावेश आहे. दरम्यान, हजरत निजामुद्दीन-त्रिवेंद्रम राजधानी एक्‍स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने...

एसटीला विठ्ठल पावलाच नाही

22/07/2011 15:57
  मिरज - एसटीला यंदाच्या आषाढीला पंढरीचा विठ्ठल पावलाच नाही. मिरज-पंढरपूर ब्रॉडगेजवर रेल्वेने भरभरून वारकऱ्यांची वाहतूक केल्याने त्याचा थेट फटका एसटीला बसला. गतवर्षीच्या तुलनेत मिरज आगाराचे उत्पन्न थेट पन्नास टक्‍क्‍यांवर आले. रेल्वे सुरू झाल्याने एसटीला फटका बसेल अशी भीती होती. तथापि, आषाढी...

विठ्ठलाची देणगी द्या क्रेडिट, डेबिट कार्डद्वारेमंदिर समिती प्रशासनाची नवी सुविधा

22/07/2011 15:47
पंढरपूर। दि. 19 (प्रतिनिधी)  श्री विठ्ठल-रुक्मिणीला देणगी देण्यासाठी आता क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करता येणार आहे. मंदिर समिती प्रशासनाच्या पुढाकाराने ही सुविधा उपलब्ध होत आहे. कार्ड स्व्ॉप करण्यासाठी मंदिर समितीच्या कार्यालयात दोन पॉस टर्मिनल (पॉइंट ऑफ) मशीन लावण्यात येत आहेत. गोरगरीब...

रेल्वे गाड्यांची होणार यांत्रिक स्वच्छता

22/07/2011 15:39
  मुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरी लोकल गाड्यांची स्वच्छता करण्यासाठी आता व्हॅक्‍यूम हायप्रेशर जेट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. या नव्या यंत्रामुळे गाड्यांची स्वच्छता जलद गतीने होईल व पाण्याचीही 30 टक्के बचत होईल, असा दावा पश्‍चिम रेल्वेच्या वतीने करण्यात आला आहे. या स्वच्छतेसाठी साडेचार...

'रेल्वे परीक्षेसाठी जास्तीत जास्त मराठी उमेदवारांनी अर्ज भरावेत'

22/07/2011 15:37
  मुंबई - रेल्वेच्या नोकर भरतीत नेहमीच महाराष्ट्रातील मराठी उमेदवारांना डावलण्यात येते; पण आता यापुढे असे होणार नाही. लवकरच महाराष्ट्रातून सुमारे दहा हजार जागांवर भरती होणार असून, या परीक्षेसाठी जास्तीतजास्त मराठी उमेदवारांनी अर्ज भरावेत. मराठी मुलांनी यासाठी अधिकाधिक रेटा लावला तर मराठी...

भंगार विक्रीतून रेल्वेला विक्रमी 351 कोटी

22/07/2011 15:34
  मुंबई - रेल्वेच्या भंगारातून तब्बल 351 कोटी 75 लाख रुपयांची घसघशीत भर यावर्षी पश्‍चिम रेल्वेच्या तिजोरीत पडली आहे. 2009-10 च्या तुलनेत या वर्षी 48 कोटी रुपये जादा मिळाले आहेत, आजवरचा हा विक्रमी फायदा आहे, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेमार्फत देण्यात आली. रेल्वेच्या वापरातून बाद झालेल्या ईएमयू...

महिला प्रवाशांना "महिला वाहिनी'चा आधार

22/07/2011 15:32
  मुंबई - लोकल व मेल एक्‍सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेने स्थापन केलेल्या "महिला वाहिनी' पथकाच्या धडक कामगिरीमुळे महिलांचा प्रवास सुखकर झाला आहे, असा दावा मध्य रेल्वेच्यावतीने करण्यात आला आहे. महिलांना प्रवासादरम्यान होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांच्या...

रेल्वेत महिला सुरक्षिततेबाबत उपाययोजना करावी

22/07/2011 15:27
  मुंबई - उपनगरी गाड्यांमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात गृहखात्याचे वरिष्ठ अधिकारी, तसेच पश्‍चिम व मध्य रेल्वेवरील आरपीएफ व जीआरपी यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र बसून उपाययोजना करावी, तसेच महिला पोलिसांची कमतरता असल्यास त्याबाबत सरकारला शिफारस करावी, असा आदेश उच्च न्यायालयाने आज...

रेल्वेला 66 लाखांचे उत्पन्न ं आषाढी यात्रेदरम्यान दहा दिवसात 83 विशेष गाडय़ांमधून सेवा

22/07/2011 15:22
  सोलापूर। दि. 19 (प्रतिनिधी) मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाला यावर्षीची आषाढी वारी फायदेशीर ठरली. रेल्वेच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 36.85 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. यावर्षी आषाढी वारीदरम्यान दहा दिवसात रेल्वेने एक लाख 16 हजार 825 वारक:यांनी प्रवास केला, त्यातून रेल्वेला 65...

वारीच्या स्वागताला सज्ज

20/06/2011 12:00
  आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. भाविकांच्या स्वागतासाठी देहूकर, आळंदीकर सज्ज झाले आहेत. प्रशासनाने सुविधांविषयक कामे युद्धपातळीवर हाती घेतली आहेत. पुढील आठवड्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक...

ठाण्याचा लोकल प्रवास असुरक्षितच

20/06/2011 11:56
कळवा कारशेडमधून ठाणे स्थानकात आलेल्या लोकलच्या डब्यात सलग दुस-या दिवशी मृतदेह आढळल्याने रविवारी एकच खळबळ उडाली. ठाणे-लोकलवरील दगडफेकीत प्रवासी जखमी होण्याच्या घटनांत गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. त्यात शुक्रवारी रात्री कळवा कारशेडमध्ये तरुणीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह टाकण्यात आल्याचे...

कोकण रेल्वे 'ठप्प'मागे मानवी चूक!

20/06/2011 11:51
  तुफान पावसामुळे कोकण रेल्वेच्या पोमेंडीजवळ कोसळलेल्या भिंतीचे ढिगारे उचलण्यात यश आले असून , त्यामुळे कोकण रेल्वेची सेवा रुळावर आली आहे . पावसाने दोन दिवस विश्रांती घेतल्यामुळे हे अडथळे दूर करण्यात यश आले . दरम्यान, रेल्वेमार्गावर संरक्षक भिंत कोसळणे ही नैसर्गिक आपत्ती नव्हे तर रेल्वेच्या...

चेंडूसारखा उडालेला मुलगा चाकाखाली दबून ठार

20/06/2011 11:48
मंद्रुप। दि. 19 (वार्ताहर) ट्रॅक्टरच्या चाकात हवा भरताना हवेचे प्रमाण जास्त झाल्याने हवेबरोबरच डिस्कसह मुलगा 20 फूट उंच उडाला आणि डिस्कखाली चिरडून तो जागीच मरण पावला. हा विचित्र अपघात रविवारी दुपारी 12 वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज (मं़) येथे घडला. निंगप्पा शरणप्पा ग्वाडय़ाळ (वय 16) असे त्याचे...

मुंबई-पुणेवर अपघातांची ‘एक्स्प्रेस’ मालिका सुरूच

20/06/2011 11:43
लोणावळा - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर तुंगार्लीजवळ (लोणावळा) पोलीस व्हॅन महामार्गाच्या नाल्यात कोसळली. अपघातात दोन पोलीस ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने रविवारी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात ठाण्याचे कॉन्स्टेबल दशरथ मोरे (वय 45), हवालदार शरद चव्हाण...

अखेर कोकण रेल्वे रुळावर

20/06/2011 11:39
सर्वप्रथम ‘कोकणकन्या’ मडगावकडे रवाना रत्नागिरी - गुरुवारपासून ठप्प झालेली कोकण रेल्वे आता पोमेंडीच्या रुळावरून धावू लागली आहे. पोमेंडीत संरक्षक भिंतीसह दरड कोसळल्याने तीन दिवस कोकण रेल्वेला सक्तीने मेगाब्लॉक घ्यावा लागला होता. पोमेंडी येथील दोन रेल्वे बोगद्यांच्या मध्ये असलेल्या या रेल्वेमार्गावर...

रेल्वे ट्रॅकची साफसफाई पूर्ण

09/06/2011 15:46
  पावसाळ्यात रेल्वेची वाहतूक विस्कळित होऊ नये, म्हणून हाती घेण्यात आलेले रेल्वे मार्गाच्या देखभालीचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी वाय. के. सिंह यांनी मंगळवारी दिली. पावसाळ्यात बऱ्याचदा रेल्वे ट्रॅकवर पाणी साठल्याने वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडतात....

ऊस संपल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही

09/06/2011 14:57
कुर्डुवाडी - विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने 2010-11 च्या चालू गळीत हंगामात जिल्ह्यात सर्वांत अधिक उसाचे 15 लाख टन गाळप केले असून शेतकऱ्यांचा ऊस संपल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही, अशी ग्वाही या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. गंगामाईनगर, पिंपळनेर...

रेल्वेतून पडून केरळचा तरुण ठार

09/06/2011 14:55
लांजा - धावत्या ट्रेनमध्ये ब्रश करीत बसलेल्या तरुणाचा तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 8 वाजता आडवली रेल्वस्थानकादरम्यान घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी - लोणावळा येथील समुद्र मेरीटाईम इन्स्टिट्यूट येथे केरळ येथील पाच तरुण मर्चंट नेव्हीच्या कोर्ससाठी...

रेल्वे दुर्घटनेत तीन वर्षांत 261 बळी

09/06/2011 14:54
बेळगाव - रेल्वेखाली सापडून मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. रेल्वे रुळ ओलांडताना अपघात होणे अथवा रेल्वेखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या करण्याऱ्यांचा देखील यात समावेश आहे. शहरातदेखील रेल्वे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला असून यासाठी रेल्वे ओव्हर ब्रिजची ठिकठिकाणी गरज भासू लागली...

राहुलकुमारची अजूनही मृत्यूशी झुंज सुरूच

03/06/2011 12:29
सांगली - रेल्वे प्रवासात गंभीर जखमी झालेल्या राहुलकुमारची अजूनही मृत्यूशी झुंज सुरूच आहे. त्याच्या नातेवाइकांचा अद्याप ठावठिकाणा लागला नसला, तरी "सिव्हिल'च्या प्रशासनाने त्याचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा सुरू ठेवली आहे. त्याच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठीही त्यांनी मध्य प्रदेशला...

सोलापुरात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

03/06/2011 12:24
सोलापूर - सोलापूर शहर व परिसराला आज वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. रुपाभवानी मंदिराच्या पाठीमागील नाल्यात एकाचा बुडून मृत्यू झाला. त्याचबरोबर शहर व हद्दवाढ भागात अनेक ठिकाणी झाडे पडल्याने नुकसान झाले. अग्निशामक दलाने युद्धपातळीवर प्रयत्न करून रात्री उशिरापर्यंत झाडे बाजूला केली. आजच्या...

रेल्वे हमाल व वाहतूकदार वाद मिटला

03/06/2011 12:16
नगर - येथील रेल्वे स्थानकातील मालधक्‍क्‍यावरील हमाल व वाहतूकदार यांच्यातील वाद मिटला असून, त्यांच्यात तीन वर्षांसाठी करार झाला आहे. त्यामुळे खत व सिमेंटचा पुरवठा सुरळीत झाला आहे. वाहतूकदार कंपनी हुंडेकरी असोसिएशन व माथाडी कामगार यांच्यात एक एप्रिलपासून आर्थिक कारणावरून वाद सुरू होता....

कोल्हापूर-हैदराबाद गाडी ठरतेय "टाईमपास एक्‍स्प्रेस'

03/06/2011 12:11
मिरज - कोल्हापूर-हैदराबाद ही गाडी "टाईमपास एक्‍स्प्रेस' ठरत आहे. वेळा पाळण्यात ती अयशस्वी ठरली असून सातत्याने सरासरी दोन ते चार तास विलंबाने धावत आहे. हुबळी विभागात या गाडीला सवतीची वागणूक देण्यात येत असल्याने कोल्हापूर-हैदराबाद प्रवास कंटाळवाणा ठरत आहे. ममता बॅनर्जींच्या रेल्वे अर्थसंकतील...

आजोबांना रेल्वे प्रवासात 40 टक्के सूट - एक जूनपासून अंमलबजावणी

25/05/2011 14:17
मुंबई। दि. 24 ज्येष्ठ पुरूष नागरिकांना एक जूनपासून लांब पल्ल्यांच्या प्रवास तिकीटावर चाळीस टक्के सुट तसेच महिला ज्येष्ठ नागरिकत्वाची वयोमर्यादा 60 वर्षाऐवजी 58 वर्षे करण्याची घोषणा रेल्वेने प्रशासनाने आज केली़ हा निर्णय 1 जूनपासून लागू होणार आहे. 25 फेब्रुवारी रोजी झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात ही...
<< 1 | 2 | 3 | 4 | 5 >>

solapur pune pravasi sangatana