रेल्वेचे ‘शुगर फ्री’ जेवण..

14/06/2013 14:21
आयआरसीटीसीची योजना : ऑगस्टपासून होणार प्रारंभ

मुंबई : लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवास करणार्‍या डायबिटीसपीडित प्रवाशांना आयआरसीटीसीकडून (इंडियन रेल्वे कॅटरिंग टुरिझम कॉर्पोरेशन) एक खूशखबर देण्यात येत आहे. डायबिटीस झालेल्या प्रवाशांची प्रवास करताना गैरसोय होऊ नये म्हणून शुगर फ्री जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यापासून राजधानी एक्स्प्रेसमध्ये ही योजना सुरू केली जाणार असल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.
मधुमेह झालेले प्रवाशांना नाइलाजास्तव गाडीतील जेवण खावे लागते. कमी साखर, मीठ आणि तेल अशी पथ्ये मधुमेही पाळतात. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून होणारा प्रवास त्यांना नकोसा होतो. हे पाहता त्यांच्यासाठी जेवणाची वेगळी व्यवस्था असावी, अशी कल्पना आयआरसीटीसीसमोर आली. त्यामुळे मधुमेहींसाठी शुगर फ्री जेवण देण्याची योजना आखण्यात आली. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेऊन जेवणाचा मेनू ठरणार असल्याचे सांगण्यात आले. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहिल्यानंतर इतर गाड्यांमध्येही अशी सोय केली जाईल. (प्रतिनिधी)

लवकरच मेनू ठरणार
- मधुमेहींसाठी शुगर फ्री जेवण देण्याची योजना तयार असून यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेऊन जेवणाचा मेनू ठरवण्यात येणार आहे.
- ऑगस्ट महिन्यापासून राजधानी एक्स्प्रेसमध्ये ही योजना सुरू केली जाणार आहे.

solapur pune pravasi sangatana