सदस्य, कॅबिनेट मंत्रिपद, १९९०ला पुन्हा निवड, पुन्हा विविध पदांची जबाबदारी असलेले कॅबिनेट मंत्रिपद, ९५ला परत विधानसभेवर निवड. त्या वेळीही कॅबिनेट मंत्रिपद, २५ डिसेंबर २००३ला विजयदादांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाचीही माळ पडली. काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे वाटचाल केलेले विजयदादा अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असून त्यांच्याकडे ग्रामीण विकास, पर्यटन अशी खाती आहेत. एकीकडे महाराष्ट्राचे राजकारण करीत असताना सहकाराच्या माध्यमातून निर्माण झालेल्या विविध संस्था आपल्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या हाती कशा राहतील हे मात्र मोहिते-पाटील घराण्याकडून आवर्जून पाहिले गेले. महाराष्ट्राचे राजकारण करणाऱ्या विजयदादांनी आपले भाऊ राजसिंह, जयसिंह, मदनसिंह, प्रतापसिंह, उदयसिंह यांच्या मदतीने तालुक्यात उभारलेल्या सहकारी संस्थांवर आपली मजबूत पकड बसविली. जिल्ह्य़ाच्या राजकारणावरही स्वत:चा ठसा उमटविणे चालूच ठेवले. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्यापासून सहकार क्षेत्रात मोहिते-पाटील यांचा जो दबदबा निर्माण झाला तो त्यांच्या मुलांकडून टिकविला जात आहे. सहकारमहर्षीची नातवंडेही सक्रिय राजकारणात उतरली असून सरपंच, उपसरपंचपदापासून खासदारपदापर्यंतच्या विविध जबाबदाऱ्या ते सांभाळत आहेत. अकलूज, माळशिरस परिसरात मोहिते-पाटील घराण्यावाचून पानही हालत नाही असे म्हटले तर ते मुळीच अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
शाळांना या काळात मान्यताही मिळू शकली नाही, अशा शब्दात ते आपली नाराजी व्यक्त करतात. तालुक्यातील राजकारणामध्ये आपले फारसे काही चालणार नाही हे लक्षात आल्याने साठी ओलांडलेले अॅड्. सुभाष पाटील राजकारण निवृत्तीची भाषा करीत आहेत. तालुक्याचा एकांगी विकास झाला. निवडणुकीच्या वेळी अकलूज परिसरातच एवढे मतदान होते की, ‘त्यांना’ तालुक्याचा पश्चिम आणि दक्षिण भागाची गरजच भासत नाही. त्यातून अशा भागाकडे दुर्लक्ष केले जाते. विरोधक एकत्र आले तर विद्यमान परिस्थितीत बदल होऊ शकतो, असे ते म्हणतात. (नजीकच्या भविष्यकाळात असे होण्याची चिन्हे दिसत नाहीत.) अॅड्. सुभाष पाटील हे एमए एलएलबी झालेले. निवडणुका चांगल्या वातावरणात होण्यासाठी मतदान सक्तीचे करावे, इंटरनेटच्या माध्यमातून मतदान करण्याची सोय करावी, अशा त्यांच्या काही सूचना आहेत पण एकूणच एकटय़ाच्या ताकदीवर राजकारण करणे कठीण जात असल्याने राजकारणातून बाजूला व्हायचा विचार ते बोलून दाखवितात.
करण्याच्या दिशेने त्यांनी पावले टाकल्यास आणि त्याचा दृश्य परिणाम दिसल्यास मोहिते-पाटील यांच्यामागे लोक मोठय़ा संख्येने उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत. मोहिते-पाटलांची भक्कम एकी आणि विरोधकांमधील बेकी, याभोवती तालुक्याचे राजकारण फिरत असताना दिसत आहे. लोकशाहीमध्ये, लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी, सहकारी संस्थांच्या सभासदांनी निवडून दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी सनदशीर मार्गाने आपल्या हाती सत्ता ठेवल्यास आक्षेप घ्यायचे काहीच कारण नाही, पण प्रत्यक्षात तसे दिसते का? हा सर्वानाच अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. स्वच्छ, पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त कारभार केल्यास अशा नेत्यांच्या मागे जनता उभी राहते हे दाखवून देण्याची संधी अजूनही गेलेली नाही. त्या संधीचे सोने करण्याचीच आज गरज आहे.|
|