नाशिक, औरंगाबाद मार्गावर शीतल बससेवा

31/07/2012 12:47
प्रवास आरामदायी व्हावा , म्हणून एसटीने मुंबई-नाशिक आणि मुंबई-औरंगाबाद या मार्गावर निमआराम वातानुकूलित शीतल बससेवा सुरू करण्याचे निश्चित केले आहे. येत्या एक ऑगस्टपासून या बससेवेला सुरूवात होणार आहे.

नाशिकमधून सकाळी पावणेसात वाजता सुटणारी बस अकरा वाजता मुंबईला पोहोचणार आहे. मुंबई सेंट्रलवरून दुपारी दीड वाजता ही बस सुटणार असून , संध्याकाळी पावणेसहा वाजता नाशिकला पोहोचणार आहे. या बससाठी २६४ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. औरंगाबादहून रात्री आठ वाजून १५ मिनिटांनी सुटणारी बस मुंबई सेंट्रलला सकाळी सहा वाजता पोहोचणार आहे. मुंबई सेंट्रलवरून संध्याकाळी पावणेसहा वाजता ही बस सुटणार असून , पहाटे साडेतीन वाजता औरंगाबादला पोहोचणार आहे. या मार्गाचे प्रवासभाडे ५४४ रुपये ठेवण्यात आले आहे. सध्या शीतल बससेवा पुणे-मुंबई आणि मुंबई-कराड या मार्गावर सुरू आहे.

 


solapur pune pravasi sangatana
Make a website for free Webnode