‘सोलापूर-नागपूर’एक्स्प्रेसच्या मुदतवाढीसाठी विभागाचे प्रयत्न

22/06/2015 12:51
सोलापूर - सोलापूर-नागपूर एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याची विनंती करणारा प्रस्ताव सोलापूर रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे पाठवला आहे. तसे झाल्यास ही गाडी नियमित होऊ शकेल. येत्या २४ जूनला या गाडीची शेवटची फेरी होईल. उन्हाळ्याच्या सुटीत ही विशेष गाडी सुरू करण्यात आली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरहून नागपूरसाठी थेट गाडी असावी, अशी प्रवाशांची मागणी होती. यंदाच्या वेळी रेल्वे प्रशासनाने नागपूरसाठी विशेष गाडी सोडून ती पूर्ण केली. ११ मार्च ते २४ जून दरम्यान आठवड्यातून एक दिवस ही गाडी धावत आहे. आतापर्यंत या गाडीच्या १६ फे-या झाल्या आहेत. गाडीस प्रवाशांचा प्रतिसाद चांगला लाभत आहे.

गाडी सध्या दर बुधवारी दुपारी वाजून २० मिनिटांनी निघते अन् नागपूरला दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचते. तर नागपूरहून दर गुरुवारी वाजता निघते अन् सोलापूरला शुक्रवारी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचते. गाडीस एकूण १२ डबे आहेत.

विजापूरसाठी नवीन गाडी
येत्याजुलैपासून सोलापूर-विजापूर नवी रेल्वेगाडी सुरू होत आहे. ती दर शनिवारी रविवारी ही गाडी धावणार अाहे. गाडीचा दर्जा अजून ठरवण्यात आला नाही. ती सुरू झाल्यानंतर ठरवण्यात येणार आहे. सोलापूरवरून सकाळी १० च्या सुमारास विजापूरला निघाले. विजापूरला दुपारी दोन वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. विजापूरहून दुपारी दोन वाजून ५० मिनिटांनी निघून सोलापूरला सायंकाळी वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. गाडीचा दर्जा अद्याप ठरायचा आहे.

‘यशवंतपूर’ला मुदतवाढ
पंढरपूर-यशवंतपूर(बंगळुरू) गाडीस मुदतवाढ दिली आहे. जूनअखेरपर्यंत धावणारी ही गाडी आता ३० ऑक्टोबरपर्यंत धावेल. दर मंगळवारी शुक्रवारी ही गाडी पंढरपूर रेल्वे स्थानकावरून दुपारी वाजून ३५ मिनिटांनी निघते. यशवंतपूरला दुस-या दिवशी सायंकाळी वाजून २० मिनिटांनी पोचते. यशवंतपूर रेल्वे स्थानकावरून ही गाडी दर सोमवारी गुरुवारी सायंकाळी वाजता निघते. पंढरपूरला दुस-या दिवशी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी पोचते.

प्रस्ताव पाठवला आहे
सोलापूर-नागपूरगाडीस मुदतवाढ देण्यात यावी, असा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविला आहे. लवकरच यावर उत्तर अपेक्षित आहे. दरम्यान, सोलापूर-विजापूर नवीन रेल्वेगाडी सुरू होणार आहे. या नव्या गाडीचा दर्जा आणि सुरू होण्याची तारीख अद्याप ठरली नसली तरी त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. नर्मदेश्वरझा , वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक, सोलापूर

solapur pune pravasi sangatana