र्जमनीची कंपनी बनवणार वेळापत्रक तीन मिनिटांनी धावणार उपनगरीय लोकल

23/09/2013 13:50
मुंबई  : उपनगरीय लोकल दर तीन मिनिटांनी धावते, असे जरी सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र उपनगरीय लोकल दर तीन मिनिटांनी धावतच नाही. त्यामुळे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसीने) उपनगरीय लोकल मार्गाच्या विकासासाठी हाती घेतलेल्या योजनांमधून दर तीन मिनिटांनी लोकल आणि स्वयंचलित वेळापत्रक पद्धत कार्यान्वित केली जाणार आहे. त्यासाठी र्जमनीतील अद्ययावत तंत्रज्ञानाची मदतही घेतली जाणार आहे.

चर्चगेट ते डहाणू आणि सीएसटी ते कर्जत-कसारा-खोपोली-पनवेलपर्यंतच्या उपनगरीय मार्गावर दर तीन मिनिटांनी लोकल चालवण्यात येत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून वारंवारकेला जातो; परंतु प्रत्यक्षात वेळापत्रकात अनेक त्रुटी दिसून देतात. या त्रुटी दूर करण्यासाठी एमआरव्हीसीने अद्ययावत तंत्रज्ञान स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, रेल ऑपरेशन सिम्युलेशन प्रोग्राम हाती घेण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे संगणकीय पद्धतीने वेळापत्रक तयार केले जाणार आहे. त्यासाठी विशिष्ट स्वरूपाचे सॉफ्टवेअर वापरले जाणार आहे. आतापर्यंत मानवी बुद्धीच्या बळावर रेल्वेचे वेळापत्रक आखण्यात येत होते. तांत्रिकदृष्ट्या या पद्धतीचे वेळापत्रक अचूक आहे, मात्र नव्या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने अधिक चांगले वेळापत्रक तयार करणे सोपे जाणार आहे.
जमनीतील आरएम कॉम ही कंपनी या पद्धतीने वेळापत्रक तयार करते. तसेच हैदराबादमधील एका कंपनीचीही मदत घेण्यात येणार आहे. त्यात संपूर्ण वेळापत्रक संगणकावर तयार केले जाणार आहे. अद्ययावत आणि स्वयंचलित असणार्‍या या तंत्रज्ञानामुळे तीन मिनिटांत लोकल चालवण्यात येणार आहे. या पद्धतीने सर्वच मार्गांवरील गाड्यांचे नियोजन करणे शक्य असल्याचे एमआरव्हीसीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. र्जमनीमध्ये या कंपनीने या प्रकारचे तंत्रज्ञान प्रत्यक्षात वापरात आणले आहे. त्यासाठी इथल्या वेळापत्रकाचा सारा डाटा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा डाटा तयार झाला की त्यापुढील प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत उपनगरीय मार्गावर देखील दर तीन मिनिटांनी लोकल धावताना दिसणार आहे.

solapur pune pravasi sangatana