ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचा रेल्वेखाली सापडून मृत्यू

22/06/2015 12:48
सोलापूर - ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आनंद सिध्दलिंगप्पा हत्तरके (वय ३२, रा. हत्तूरे वस्ती, मल्लिकार्जुन नगर) यांचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी कुमठे रेल्वे गेटजवळ उघडकीस आली.

आनंद हत्तरके यांचा टेम्पोचा व्यवसाय होता. त्यांनी आत्महत्या केली आहे की रेल्वेच्या धडकेने त्यांचा मृत्यू झाला आहे याबाबत स्पष्ट चित्र समोर येऊ शकले नाही. सोलापूर लोहमार्ग पोलिसात या घटनेची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.

त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले अाणि मुलगी असा परिवार आहे. अद्याप नातेवाइकांकडून माहिती घेण्यात आलेली नाही. नातेवाइकांकडे चौकशी केल्यानंतर घटनेचे खरे कारण समोर येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्याम पोरे यांनी दिली.

solapur pune pravasi sangatana