एक्स्प्रेस वेवर खंडाळ्याजवळ दरड कोसळली, मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प

22/06/2015 12:44

मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक रखडली आहे. मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे.

 

खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे, वाहतूक जुन्या मार्गावर वळवण्यात आली आहे.

आधीच पावसामुळे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच आज सोमवार असल्याने एक्स्प्रेस वेवर प्रंचड वाहतूक असते. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या तर अधिक असते. मात्र आज खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.


solapur pune pravasi sangatana