अर्थसंकल्पासाठी तीन नव्या गाड्या

16/10/2013 16:55
सोलापुर-पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे

अर्थसंकल्पासाठी तीन नव्या गाड्या

तर वैष्णवीचे दर्शन..

या गाड्यांसाठी जादा कोचेस

अन्य रेल्वे गाड्यांचे डबे वाढविण्याचा प्रस्ताव

सोलापूर : आगामी रेल्वे अर्थसंकल्पाचा विचार करून मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने तीन नव्या गाड्यांचा प्रस्ताव तयार केला असून, त्यात सोलापूर-नागपूर (व्हाया कुडरूवाडी, लातूर), सोलापूर-गोवा (व्हाया हुबळी, कारवार) आणि दौंडमार्गे सोलापूर-जयपूर या तीन नव्या गाड्यांचा त्यात समावेश आहे. याशिवाय पंढरपूर-कुडरूवाडी-पंढरपूर, लातूर-तिरुपती (व्हाया सोलापूर) आणि सोलापूर-कोल्हापूर (दिवसा) या गाड्यांचाही प्रस्ताव असल्याचे वरिष्ठ विभागीय परिचालन प्रबंधक सुशील गायकवाड यांनी सांगितले.
सध्या विजापूर-मुंबई आणि पंढरपूर-मुंबई या दोन गाड्या आठवड्यातून ३-४ दिवस धावतात. या दोन्ही गाड्या नियमित कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करून त्याचाही प्रस्तावात समावेश करण्यात आला आहे. काही गाड्यांचा विस्तार करण्याची सूचनाही रेल्वे प्रशासनाने प्रस्तावात केली आहे. हुबळी-हैदराबाद ही गाडी सध्या होटगीपर्यंत येते. त्यामुळे सोलापूरहून हैदराबादला, हुबळीला जाणार्‍या आणि हुबळीहून सोलापूरला येणार्‍या प्रवाशांचा विचार करून ही गाडी सोलापूरपर्यंत आणण्याचा प्रस्ताव आहे. पुणे-मनमाड ही रेल्वे इगतपुरीपर्यंत नेण्याचा उल्लेखही प्रस्तावात केला आहे. मुंबई-पंढरपूर फास्ट पसेंजर ही गाडी मिरजपर्यंत सोडण्याचेही प्रस्तावात म्हटले आहे. अर्थसंकल्पासाठी हा प्रस्ताव मुंबई मुख्यालयाकडे पाठवून देण्यात येणार असून, तेथील छाननीनंतर रेल्वे मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठवून देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) तर वैष्णवीचे दर्शन.. ■ रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांचा मतदारसंघ हा सोलापूर विभागाच्या हद्दीत येतो. या मतदारसंघातील प्रवाशांसाठी गुलबर्गा-कटरा ही गाडी सुरू करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. गुलबर्गा रेल्वे स्थानकावरील पीटलाईनचे काम पूर्ण झाले तर ही गाडी सुरू झाली तर गुलबर्गा आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना वैष्णवी देवीचे दर्शन होण्यास सुलभ होणार आहे. या गाड्यांसाठी जादा कोचेस ■ हुतात्मा एक्स्प्रेससाठी एक सर्वसाधारण डबा, एक वातानुकूलित डबा, सोलापूर-पुणे पॅसेंजरसाठी एक स्लीपर कोच, विजापूर-भोलाराम (हैदराबाद) गाडीसाठी दोन सर्वसाधारण डबे तर शिर्डी-मुंबई फास्ट पॅसेंजर ही गाडी १२ डब्यांची करावी, असे प्रस्तावात म्हटले आहे.

solapur pune pravasi sangatana