किल्ले महिमानगड

किल्ला माण तालुक्यात दहिवाडी नावाच्या खेडाच्या पश्चिमेला ५.५० मैलांवर शिद्रिबुद्रुक खेडात येतो.सातारा जिल्ह्यातील माण तालुका हा कमी पावसाचा त्यामुळे पावसाचे दुर्भिक्ष याच्या पाचवीला पुजलेलं
इतिहास :
साताराच्या पूर्वेकडील प्रांताचे संरक्षण करण्याकरीता शिवरायांनी जे किल्ले घेतले त्यापैकीच एक महिमानगड. पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरीता महार रामोशी मिळून ७५ इसम ठेवलेले होते.किल्ल्याचा हवालदार आणि सबनीस यांची इनामे
आपही वंशज पाटील व कुळकर्णी यांच्याकडे चालू आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
गडाच्या प्रवशद्वाराच्या चौकटीतच हत्तीचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. प्रवशद्वारातून आत शिरल्यावर समोरच हनुमानाचे बिनछप्पराचे देऊळ दिसते.त्याच्या समोरच बुरुजावर जाण्यासाठी केलेल्या पायया दिसतात.येथून थोडे पुढे गेल्यावर समोरच पाण्याचे सुंदर तलाव आहे.तलाव ब-यापैकी खोल आहे.या तलावाला बारामही पाणी असते.त्याच्याच बाजूला वाडांचे भनावशेष दिसतात.येथून संपूर्ण गडाची तटबंदी नजरेस पडते.गडाच्या ईशान्येस गडाची एक सोंड लांबवर गेलेली दिसते.या सोंडेला पकडून एक डोंगररांग पुढे गेलेली आहे.या सोंडेवर थोडेफार वाडाचे अवशेष दिसतात.किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या आजुबाजुला असणारी तटबंदी चांगल्या स्थितित शाबूत आहे.गड फिरण्यास साधारण अर्धातास पुरतो किल्ल्यावरून वर्धनगड,ईशान्येकडे असणारा मोळ घाट असा सर्व परिसर.
गडावर जाण्याच्या वाटा :
महिमानगड गाव मार्गे किल्ल्यावर जाण्याचा मार्ग हा सातारा - पंढरपूर मार्गावर पुसेगावच्या पुढे १२ कि.मी अंतरावर असणा-या महिमानगड फाटावरून पुढे जातो.दहिवडी कडून साता-याकडे येणा-या रस्त्यावरुन सुध्दा महिमानगड फाटावर उतरता येते. महिमानगड फाटावरून महिमानगड गावात जाण्यास वीस मिनिटे लागतात.फलटण -दहिवडी मार्गेसातारा गाडी किंवा सातारा पुसेगावमार्गेपंढरपूर जाणारी गाडी देखील महिमानगड फाटापाशी थांबते.महिमानगड गावातूनच किल्ल्यावर एक पायवाट जाते.या वाटेने गड गाठण्यास २५ मिनिटे पुरतात.गडावर चढतांना त्याच्या अभेपणा प्रत्येक क्षणोक्षणी जाणवत असतो.गावाच्या जिल्हापरिषदेच्या कायार्लया समोरूनच एक वाट गडावर जाते.वाट थेट प्रवशद्वारातच घेऊन जाते.प्रवशद्वाराचे बुरुज आजही चांगल्या अवस्थेत आहेत.
राहण्याची सोय : किल्ल्यावर नाही.
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपणच करावी.
पाण्याची सोय : गडावर नाही
जाण्यासाठी लागणारा वेळ : महिमानगड गावातून अर्धातास.
जाण्यासाठी उत्तम कालावधी : सर्व ऋतुत जाता येते.
 

solapur pune pravasi sangatana
Create a free website Webnode