म्हैसूर, जयपूर रेल्वेस हिरवा कंदील

09/11/2011 13:58
सोलापूर, दि. २८ (वार्ताहर) – गेल्या अनेक दिवसापांसून सोलापूरातील व्यापारी आणि पर्यटकांनी म्हैसूर, अहमदाबाद आणि जयपूर येथे जाण्यासाठी रेल्वे सुरु करावी अशी मागणी केली होती. रेल्वे प्रशासनाने व्यापारी आणि पर्यटकांची ही मागणी पूर्ण करीत या तिन्ही गाड्यांना हिरवा कंदील दिला आहे. सध्या या गाड्या प्रायोगिक तत्वावर नवरात्र, दसरा तसेच दिवाळी निमित्त सोडण्यात येत असल्या तरी प्रवाशांचा प्रतिसाद पाहून तिन्ही गाड्या कायमस्वरुपी धावतील, असे रेल्वेने स्पष्ट केले. गाडी क्र. ०९७१५ ही जयपूर स्थानकावरुन प्रत्येक सोवारी दुपारी १२ वा. ५५ मी. सुटणार आहे. मनमाड, कोपरगाव, शिर्डी, पुणतांबा, बेलापूर, नगर, दौंडमार्गे जेऊर, कुर्डुवाडी येथे रात्री १ वा., माढा १ वा. ५ मी., मोहोळ १ वा.५० मी. तर सोलापूर स्थानकावर बुधवारी पहाटे २ वा. ३५ मी. ही गाडी पोहोचेल. प्रत्येक बुधवारी सोलापूर स्थानकावरून गाडी क्र. ०९७१६ सोलापूर – शिर्डी – जयपूर पहाटे ६ वा. ४५ मी. सुटेल, मोहोळ ७ वा.१०, माढा ७.३०, कुर्डुवाडी ७.४५ वा पोहचेल तर जयपूर स्थानकावर गुरुवारी सायं ६ वा.३० मी. पोहचेल. या गाडीस एकूण १६ कोचेस असणार आहेत. यशवंतपूर – अहमदाबाद गरीब रथ या साप्ताहिक गाडीसदेखील सुरवात झाली असून ही गाडी क्रमांक ०६५०१ प्रत्येक मंगळवारी यशवंतपूर स्थानकावरून पहाटे ५. २० वा. सुटेल विजापुरहून ही गाडी सोलापूर स्थानकावर रात्री ११ वा. ४५ मी. पोहचेल तर अहमदाबाद येथे बुधवारी दुपारी ४ वा.१० मी. पोहचेल. अहमदाबाद स्थानकावरुन ही गाडी प्रत्येक बुधवारी रात्री ८ वा.१५ मी. सुटेल आणि पुणे, दौंड, कुर्डुवाडीहून सोलापूर स्थानकावर दुपारी १२ वा. ०५ मी. पोहचेल. या गाडीस १२ कोचेस राहतील. गाडी क्र. ०६२०१ म्हैसूर- शिर्डी ही साप्ताहिक गाडी प्रत्येक सोवारी म्हैसूर स्थानकावरुन सकाळी ९ वा. ५० मी. सुटेल, बेंगलोर, विजापूरमार्गे सोलापूर स्थानकावर ही गाडी मंगळवारी सकाळी ६ वा. ३० मी. पोहोचेल

solapur pune pravasi sangatana